शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात लवकरच मेडिकल कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:07 IST

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पडवे येथे तब्बल ६५० बेडचे जागतिक दर्जाचे लाईफ टाईम हॉस्पिटल सुरू झाल्याने येथील जनतेसह कोकणवासीयांना अधिक उपचारासाठी आता गोवा, कोल्हापूर, बेळगाव येथे जाण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही आजाराचे योग्य निदान याठिकाणी अगदी माफक दरात केले जाणार आहेत. आगामी काळात महात्मा फुले जनारोग्य योजनेशी हे हॉस्पिटल जोडले जाईल. ...

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पडवे येथे तब्बल ६५० बेडचे जागतिक दर्जाचे लाईफ टाईम हॉस्पिटल सुरू झाल्याने येथील जनतेसह कोकणवासीयांना अधिक उपचारासाठी आता गोवा, कोल्हापूर, बेळगाव येथे जाण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही आजाराचे योग्य निदान याठिकाणी अगदी माफक दरात केले जाणार आहेत. आगामी काळात महात्मा फुले जनारोग्य योजनेशी हे हॉस्पिटल जोडले जाईल. यामुळे गोरगरिबांना मोफत उपचार दिले जातील, असे सांगतानाच या मेडिकल कॉलेजची परवानगी अंतिम टप्प्यात असून, तेही लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कुडाळ तालुक्यातील पडवे येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफ टाईम हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृपाशंकर सिंह, गोवा भाजपचे अध्यक्ष विनायक तेंडोलकर, गोव्याचे मंत्री जयेश साळगावकर, आमदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रमाकांत खलप, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी खासदार नीलेश राणे, डॉ. आर. एस. कुलकर्णी, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व हजारोंच्या संख्येने जिल्हावासीय उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गसारख्या निसर्गरम्य तरीही ग्रामीण अशा भागात एवढे मोठे रुग्णालय उभारणे, हे मोठे धाडसाचे काम आहे. अशा प्रकारचे रुग्णालय राणे यांनी नवी मुंबई आदी भागात सुरू केले असते तर त्यांना मोठा बिझनेस मिळविता आला असता. मात्र त्यांना पैशांपेक्षा आपल्या माणसांच्या प्रेमाचा परतावा महत्त्वाचा वाटला म्हणूनच त्यांनी या जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील लोकांसाठी हे भव्य आणि अद्ययावत असे रुग्णालय सुरू केले आहे. हे रुग्णालय तयार करताना प्रत्येक छोट्यात छोट्या गोष्टीचा बारकाईने विचार केलेला दिसत आहे, असेही ते म्हणाले.३७ हजार जणांवर मोफत उपचारमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ‘मुख्यमंत्री आरोग्य सेवा’ ही नव्याने योजना सुरू केली. गेल्या साडेतीन वर्षांत दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या तब्बल ३७ हजार रुग्णांवर या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.पर्यटन व रोजगार निर्मितीला चालना मिळणार : मुख्यमंत्रीया रुग्णालयामध्ये परदेशातील रुग्णांवर अगदी माफक दरात उपचार केले जाणार आहेत. विदेशी पर्यटक याठिकाणी आल्यास अर्थव्यवस्था वाढून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.